सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

देऊळगावराजे- सिध्दटेक (ता. कर्जत) येथे संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पहाटे चार वाजल्यापासून सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दौंड, कर्जत, श्रीगोंदा तालुक्‍यातून आलेल्या असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर पहाटे चार वाजता उघडण्यात आले होते, त्यानंर श्रींच्या मूर्तीला स्नान घालून अभिषेक करण्यात आला आणि मंदिराचे प्रवेशद्वार दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता श्रींना नैवद्य दाखवण्यात आला. त्यानंतर चिंचवड देवस्थानकडून आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला, तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)