सिद्धार्थ संघवीचा सहकाऱ्यानेच काढला काटा

पोलिसांचा दावा : अन्य तिघांनाही घेतले ताब्यात 
मुंबई – एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या त्यांच्या सहका-यांकडून करण्यात आली असावी, अशी शक्‍यता मुंबई पोलिसांनी वर्तविली आहे. संघवी यांची काही दिवसांपूर्वीच बढती झाली होती. आपल्याला डावलून संघवींना बढती देण्यात आल्याच्या रागातूनच संघवी यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समजते.

एचडीएफसी बॅंकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या 37व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. बेपत्ता असलेल्या संघवी यांचा मृतदेह आज कल्याणमध्ये सापडला. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या हत्याप्रकरणी सरफराज शेख या आरोपीला कोपरखैरणे येथील बोनकोडे भागातून अटक केली होती. त्याने हत्येची कबुली दिली आहे. संघवी यांचा मृतदेह हाजीमलंग रस्त्यावर टाकून दिल्याची माहिती सरफराज याने दिल्याने मुंबई पोलिसांनी हाजिमलंग परिसरामध्ये मृतदेहाची शोधाशोध सुरू केली होती. दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी या अन्य तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, संघवी एचडीएफसीमध्ये लोअर परेल येथील कमला मिल येथील कार्यालयात कार्यरत होते. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयातून बाहेर पडले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. सायंकाळी वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)