सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा अफेरमध्ये

सिद्धार्थ मल्होत्रासाठी सध्या काही खास चाललेले नाही. एकतर त्याच्या सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर दणकून आपटत आहेत. दुसरीकडे त्याचे ब्रेक अपही झाले आहे. त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड आता रणबीर कपूरबरोबर मस्त एंगेज झाली आहे.

सिद्धार्थ मल्होत्राला आता हे समजत नाही की करिअर सांभाळायचे की पर्सनल लाईफवर लक्ष केंद्रीत करायचे. त्याचे लक्ष सध्या प्रेम- मुहोब्बत आणि इश्‍क या विषयांवरच जास्त केंद्रीत झाले आहे. त्याचे नाव सध्या जॅकलीन फर्नांडिसशी जोडले जात होते. त्यानंतर त्याचे नाव कियारा अडवाणीशीही जोडले जात होते. एवढेच नव्हे तर नोरा फतेहीबरोबरही त्याचे डेटिंग चालू असल्याचे ऐकिवात आले होते. तिच्याशीच त्याची जवळीक सध्या जरा जास्त आहे.

नोराही तिच्या ब्रेक अपमधून अद्याप सावरलेली नाही. नोरा आणि अंगद बेदी यांच्यातले अफेअर संपले आणि अंगदने नेहा धुपियाबरोबर गुपचूप लग्नही उरकून घेतले. सिद्धार्थ आणि नोरा हे दोघेही ब्रेक अप झालेले एकमेकांच्या जवळ आले आहेत. दोघेही सध्या एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम घालवत असतात. पण दोघांपैकी कोणीही आपल्या रिलेशनशीपला दुजोरा दिलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
1 :blush:
3 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)