सिद्धार्थ नाव अजूनही अलियाला प्रिय

अलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राने आपले रिलेशन अद्याप ऑफिशियल केलेले नाही. मात्र दोघांच्या अफेअरची चर्चा मात्र खूप दिवसांपासून चालली आहे. या दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याचेही गेल्या वर्षी बोलले जायला लागले होते. दोघांनी आता आपापले रस्ते वेगवेगळे ठेवले असले तरी सिद्धार्थ हे नाव आलियासाठी आजही प्रिय आहे. “राजी’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलिया आली असताना तिने “फेसबुक लाईव्ह’चा आधार घेतला.

या लाईव्ह प्रमोशन दरम्यान ती म्हणाली, सिद्धार्थ कदमबरोबर तिला बोलायचे आहे कारण सिद्धार्थ हे नावच मला खूप आवडते. सिद्धार्थ मल्होत्राने काही महिन्यांपूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना आपण “सिंगल’असल्याचे म्हटले होते. अलियानेही नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये बोलताना आपण “सिंगल’ असल्याचे सांगितले होते. अलिया सध्या “राजी’च्या प्रमोशनव्यतिरिक्‍त “गली बॉय’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने नुकतेच “ब्रम्हास्त्र’च्या शुटिंगचे पहिले शेड्युलही पूर्ण केले आहे. या शुटिंगदरम्यान तिच्या खांद्याला थोडी दुखापतही झाली आहे. असे असले तरी सिद्धार्थ बरोबरच्या ब्रेक अपची कोणतीही लक्षणे तिच्या चेहऱ्यावर कधीही दिसली नाहीत. म्हणजे मग यांच्यात कधी ब्रेक अप झालाच नाही, असे समजायचे की काय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)