सिद्धार्थ-कियारा रिलेशनशीपमध्ये?

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या प्रेम प्रकरणाला काळ लोटला. एकीकडे, आलियाने रणबीर कपूरसोबत डेटिंगला सुरुवात केली. त्यातच आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहे. कियारा “एम एस धोनी’च्या बायोपिकमध्ये सुशांत सिंगसोबत झळकली होती.

सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. करण जोहरच्या पार्टीमध्ये दोघांची वारंवार भेट होऊ लागली आणि त्यांच्यातील जवळीक वाढली.

-Ads-

आलियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थने मैत्री कायम ठेवली होती. मात्र तिने रणबीरसोबत सूत जुळवल्याचे सिद्धार्थच्या पचनी पडलेले दिसत नाही.

कियाराच्या बर्थडे पार्टीमध्ये आलेल्या मोजक्‍या पाहुण्यांमध्ये सिद्धार्थ होता. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. “स्टुडंट ऑफ द ईयर’मधून आलिया आणि सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या वेळीच त्यांच्यातील नातं फुललं, बहरलं. अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या वर्षीच त्यांचे ब्रेकअप झाले आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची चर्चा रंगू लागली. रणबीर कपूर आणि आलिया भट आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्रीत झळकणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)