सिद्धार्थनगर भागात स्वच्छतेचा बोजवारा

पिंपरी – तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यामुळे दापोडीतील सिद्धार्थनगर रहिवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दापोडी प्रभागातील शेवटचे टोक असलेल्या पुणे-मुंबई रस्त्यालगतचा सिद्धार्थनगर हा जवळपास सात ते आठ हजार लोकवस्तीचा भाग आहे. एकीकडे शहराच्या भरभराटीत तितकाच दुर्लक्षित व मागास राहिल्याचे येथील मुलभूत प्रश्न समोर येत आहे. एकीकडे पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या वल्गना करीत असताना येथील नागरीकांना मुलभुत सुविधाच व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही ही माणसं आहोत अशी आर्त हाक येथील रहिवाशांकडुन ऐकायला मिळते. उघडी गटारे तुंबलेले चेंबर, झाकणं नसलेले चेंबर यामुळे मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे.

-Ads-

नागरिकांना यातूनच रहदारी करावी लागते. लहान मुले, ज्येष्ठांचे आरोग्य अबाधित कसे राहणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. या भागात कष्टकरी कामगार, मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. खचलेले छोटे रस्ते त्यात वर खाली खड्डेमय चेंबर, उघडी गटारे यामुळे रहिवाशांना दुर्गंधी बरोबरच अन्य साथीच्या आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. तुंबलेल्या सांडपाण्यामुळे डास, किटकांच्या प्रमाणातही या परिसरात वाढ झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)