सिद्धरामैय्यांनी कर्नाटकांत हिंदुंमध्ये फूट पाडली – शहा

अमित शहा यांचा आरोप
दावणगीरी – कर्नाटकातील सिद्धरामैय्या यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असून त्यांनी राज्यातील हिंदुंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ते सध्या कर्नाटकच्या दोन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर आले असून आज येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की लिंगायत समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा देण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे हिंदुंमध्ये फूट पाडण्याचेच कारस्थान आहे असे ते म्हणाले. निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर या सरकारने लिंगायत आणि वीर शैव यांच्यातही फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे असे ते म्हणाले. हा निर्णय सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर का घेतला असा सवाल करून त्यांनी सरकारला तुम्ही पाच वर्षे झोपला होता का असा प्रश्‍न केला.

युपीए सरकार केंद्रात सत्तेवर असताना त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे त्यावेळी मुख्यमंत्री का गप्प बसले असा सवालहीं त्यांनी केला. केवळ येडियुरप्पांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठीच कॉंग्रेसने ही खेळी केली आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातील हिंदुंची मंदिरे आणि मठही ताब्यात घेण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे पण आम्ही केलेल्या विरोधामुळे त्यांना हा प्रयत्न सोडून द्यावा लागला असे ते म्हणाले. सिद्धरामैय्या हे हिंदु विरोधी आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)