सिद्धनाथ पतसंस्थेची सभा वादळी

दहिवडी : अध्यक्ष, व्यवस्थापक निघून गेल्यानंतर सभासदानी व्यासपीठाचा ताबा घेतला.

सभासदांनी गोंधळ घातल्याने पदाधिकारी व्यासपिठावरून निघून गेले

दहिवडी, दि. 30 (प्रतिनिधी) – सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था दहिवडीची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होताच सभासदांनी गोंधळ घातला. ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्याआधीच अध्यक्षनी सभा संपल्याचे जाहीर केल्याने एकच गोंधळ उडाला. काही वेळात संस्थापक, अध्यक्ष, व्यवस्थापक काही काळ व्यासपीठावरून निघून गेले. दरम्यान, पोलिसही त्याठिकाणी दाखल झाल्यानंतर काही सभासद आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली. पोनि वाघ यांनी व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना बाहेर आणले. सभासदांनी व अध्यक्ष, संस्थापक त्या ठिकाणी हजर झाले व पुन्हा सभा सुरू करण्यात आली.
दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होताच जुने कर्मचारी यांची परीक्षा घेण्याचा निर्णय कोणी घेतला. त्यांना एक वर्ष मॅनेजर म्हणून काम करत असताना देखील कायम का करण्यात आले नाही.? अध्यक्ष व संचालक यांच्या नावे कर्ज कसे दिले गेले.? कर्मचारी यांचा दिवाळी बोनस दिला नाही.? मुंबईमधील शाखेमधून विनासहीचे पैसे काढल्याचे सभासदांनी आरोप केले असता. संबंधित कर्मचारी कामावरून काढून टाकल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले तसेच संस्थेला एवढे पुरस्कार मिळत असताना एक ही विरोधक बोलत नसेल तर ही मोठी हास्यास्पद बाब आहे, असे त्यांनी सांगितले. संस्थापक वाघोजीराव पोळ म्हणाले, शेजारच्या तालुक्‍यातील सर्व पतसंस्था बुडल्या आहेत. तसेच जर करायचे असले तर तुम्ही करू शकता. तालुक्‍यातील कोणत्याही बॅंकेने आपल्या एवढा पगार व बोनस दिला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त आपली पतसंस्था देईल. ठेवीदारांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या आहेत त्याला कसलाही धक्का लागणार नाही, असा शब्द शहाजी दडस यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)