दौंड- दौंडमध्ये सोमवारी (दि.10) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने बसवर दगडफेक करण्यात आली आहे. दौंड शहरातील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयासमोर सिद्धटेकवरुन दौंडकडे येणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी एसटी बसचालक शिवाजी रामचंद्र होले यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
सोमवारी (दि.10) कॉंग्रेस आणि देशातील इतर 20 राजकीय पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दौंड-सिद्धटेक ही बस दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दौंड शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यार्थ्यांसमोर आली असताना भारत बंदच्या अनुषंगाने निघालेल्या मोर्चातील मनसेचे दौंड तालुका अध्यक्ष सचिन कुलथे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर, जमीर सय्यद, अजय कुरेशी आणि एक अनोळखी व्यक्‍ती याने बस अडवली. सचिन कुलथे याने दगड आणि काठी मारुन बसच्या दोन काचा फोडून अंदाजे 15000 रूपयांचे नुकसान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)