सिद्धटेकला गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

देऊळगावराजे – सिद्धटेक (ता. कर्जत) येथील सिद्धिविनायक मंदिरात आज गणेश जन्मानिमित्ताने सकाळी येथील जहागीदार यांच्या हस्ते मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यांनतर 9 ते 11 पर्यंत कीर्तनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्या उपस्थित होते. यावेळी पंचपक्वान्नाचा नैवेद्य ठेवण्यात आला होता. या निमित्ताने सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सजवण्यात आले होते. मंदिरच्या गाभाऱ्यात सजावट करण्यात आली होती. सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. रात्री 8 वाजता गणपतीची पदे म्हणण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (दि. 9) भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड देवस्थानकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)