सितेवाडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

ओतूर – गुणवत्तेसाठी आणि भौतिक सुविधांसाठी लोकसहभाग आणि विविध स्पर्धांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे आदी बाबतीत व्यवस्थापन समिती सहकार्य करेल, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारची बक्षिसे देण्यास मदत करू, असे मत व्यवस्थापन समितीचे सदस्य महेंद्र मोजाड यांनी व्यक्त केले. सीतेवाडी केंद्रातीत एकूण 12 जिल्हा परिषद शाळांतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्यांसाठी शिक्षण विभागाने सितेवाडी (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. 20) आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आणि मार्गदर्शन शिबिरात महेंद्र मोजाड बोलत होते. यावेळी शिक्षकांनी शाळांच्या यशोगाथा आणि शाळा व्यवस्थापन समितीचे योगदान स्पष्ट केले, तसेच शिक्षण हक्क कायदा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शालेय विकास आराखडा, शाळा सिध्दी आदींबाबत मार्गदर्शन झाले. यावेळी विकास मोजाड, महेंद्र मोजाड, सामाजिक कार्यकर्ते गोविद साबळे, मुख्याध्यापक निवृत्ती खुटाण आदी उपस्थित होते. या कार्यकमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख बारसु घोटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन योगेश खेत्री यांनी केले. गणेश ढमाले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)