सिटी प्राइड बंद; अन्य सिनेमागृहे ओस

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. एरवी, सुटीच्या दिवशी हाऊसफुल्ल असलेली सिनेमागृहे ओस पडली होती. तर सिटी प्राइडसारख्या व्यवस्थापनांनी थिएटर बंद ठेवणेच पसंत केले होते.

सध्या हिंदी तसेच अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित झालेले आहेत. या सिनेमांसाठी एरव्ही तिकीट मिळेल, की नाही अशी शंका असते. मात्र बंदच्या आवाहनामुळे किंवा दंगलीच्या भीतीने अनेक नागरिक घराबाहेरच पडले नाहीत. तिकिट बुकींग करणाऱ्या साइट्‌सवर पुण्यातील जवळपास सर्वच थिएटरमध्ये तिकिट्‌स सहजपणे बूक करता येत होती. मात्र बुकिंग करताना एक दोन जागा वगळल्या, तर संपूर्ण थिएटर रिकामी होती. काही बड्या थिएटरर्सने शो बंद केले होते. तर सिंगल स्क्रिन थिएटर मात्र बऱ्यापैकी प्रमाणात सुरू होते. दुपारनंतर त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत होता. मात्र अनेक थिएटर व्यवस्थापनांनी गेटवर मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. तसेच तिकीट विकतानाच चित्रपटाचा खेळ रद्द होऊ शकतो, याबाबतही कल्पना दिली होती. त्यामुळे अनेकांनी सिनेमा न पाहणेच पसंत केले होते. काही सिनेमागृहांमध्ये दिवसभरात एक ते दोन शो लावण्यात आले होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)