“सिटी को ऑर्डिनेटर’ची निवड

पिंपरी- महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत “स्वच्छ सर्व्हेक्षण-2019’साठी कंत्राटी तत्वावर “सिटी को-ऑर्डिनेटर-अमृत’ म्हणून विक्रमसिंह शशिकांत खाडे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नागरिक विकास अभियान संचालनालय स्मार्ट सिटी अमृत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांच्या वतीने या संदर्भात 30 ऑक्‍टोबर 2018 रोजी महापालिकेला पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार विक्रमसिंह खाडे 1 नोव्हेंबर 2018 रोजी महापालिका कार्यालयीन वेळेत रुजू झाले असून तसा अहवाल त्यांनी सादर केला आहे. नियुक्तीच्या दिनांकापासून ते “स्वच्छ सर्व्हेक्षण 2019′ पूर्ण होईपर्यंत अर्थात चार महिने परिश्रमिक भत्ता म्हणून दरमहा 55 हजार रुपये प्रमाणे 2 लाख 20 हजार रुपये इतकी रक्कम खाडे यांना अदा करावी लागेल, असे शासनाच्या पत्रात म्हटले आहे.

खाडे यांच्याकडून दैनंदिन हजेरी आणि कामकाज अहवाल घेतला जाणार आहे. त्यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण-2019 अंतर्गत महापालिका आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आणि स्वच्छ भारत अभियान कक्षाचे कामकाज “स्कोप ऑफ वर्क’ नुसार करावे लागणार आहे. ‘सिटी को-ऑर्डिनेटर-अमृत’ म्हणून विक्रमसिंह खाडे यांना देण्यात येणाऱ्या परिश्रमिक भत्त्याचा खर्च सन 2018-19या आर्थिक वर्षातील स्वच्छ भारत अभियान कक्षाकडील “क्षमता बांधणी आणि प्रशासकीय व कार्यालयीन खर्च प्रशिक्षणासह’ या लेखाशिर्षातून करण्यात येणार असून त्यांला स्थायी समिती सभेने मान्यता दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)