सिटा व्हाईट प्रकरणी इम्रान खान यांना पाक न्यायालयाचे समन्स 

पेशावर (पाकिस्तान): सिटा व्हाईट प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने समन्स पाठवले आहे. पेशावर उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना 13 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. 25 जुलैच्या बन्नू मतदार संघातील इम्रान खान यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार इनामुल्ला खान यांनी इम्रान खान यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे.

आपल्या उमेदवारी अर्जात इम्रान खान यांनी आपली 4 वर्षे वयाची कन्या तायरियान व्हाईट हिची माहिती दिली नसल्याचा आरोप इनामुल्ला खान यांनी केला आहे. आपल्या कन्येची माहिती न देऊन इम्रान खान यांनी राज्यघटनेतील कलम 62 आणि 63 पूर्तता केली नसल्याचा आरोप इनामुल्ला खान यांनी केला आहे. इम्रान खान यांना अमेरिकन नागरिक असलेल्या सिटा व्हाईट यांच्यापासून एक कन्या झालेली आहे. इम्रान खान हेच तायरियान खान हिचे कायदेशीर वडील असल्याचा लॉस एंजेलिस न्यायालयाने निर्णय दिलेला असल्याचा दावा इनामुल्ला खान यांनी केला आहे.

पेशावर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती इक्रमुल्ला खान आणि इश्‍तियाक इब्राहिम यांच्या खंडपीठाने इम्रान खान यांना 13 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. निवडणुकीच्या काळात आपण हरकत घेतलेली असूनही बन्नूच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांचा अर्ज स्वीकारला, अशी तक्रार इनामुल्ला खान यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)