सिग्नल यंत्रणा प्रत्यक्षात सुरू होणार ?

बारामती – शहरातील बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असली, तरी सिग्नलयंत्रणा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे बारामतीकारांचे लक्ष लागले आहे. वाढते नागरिकरण तसेच वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील महत्त्वाच्या काही चौकांत सिग्नलयंत्रण बसवण्यात अली मात्र, सुरुवातीचे काही दिवस सोडले, तर ही यंत्रण कोलमडलेली आहे.

शहरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या इंदापूर, भिगवण, एमआयडीसी चौकात ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या चौकांमध्ये वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. तर शहरात सध्या पार्किंगची समस्या जटील झाली असून मुख्य बाजारपेठेत अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात असल्याने या कोंडीत अधिकच भर पडत असल्याने वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली असूनही प्रशासनाचे मात्र, याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

शहरात सर्वाधिक वाहनांची वर्दळ भिगवण रस्त्यावर असते. या रस्त्याच्या विकासासाठी आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, बंद अवस्थेत असलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे या रस्त्यावर देखील वाहतूककोंडी होत आहे. बारामती शहरातील चौकात होत असलेली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच कुचकामी ठरलेली यंत्रणा सध्या ठप्प झाली आहे. इंदापूर चौकातील दिवे लावल्यापासून आद्यापर्यंत लागलेच नाहित. येथील सिग्नल यंत्रणेचे साहित्य देखील चोरी झाले आहे. एमआयडीसी चौकात सिग्नल यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर गरज असताना या चौकातील यंत्रणा बंद आहे. बारामती एमआयडीसी कंपनीत काम करणारे हजारो कामगार, विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलात शिकणारे हजोरो विद्यार्थी, तसेच कंपनीच्या माल वाहतूक करणारी हजारो वाहने या चौकातून जात असतात. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने वेगावर नियंत्रण नसते, त्यात छोटे-मोठे अपघात होत असून यात अनेकजण जायबंद झाले असून अपघातामुळे वाद होत असून ते पोलीस ठाण्या पर्यंतही पोहोचले आहेत. यापूर्वी देखील भिषण अपघात या चौकात झाले आहेत. त्यामेध्ये काहिंना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तरीही बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्याबाबत नगरपालिका प्रशासनाची उदासिनता स्पष्ट होत आहे. हीच उदासीनता झटकण्यासाठी प्रशासनाकडून यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे असले तरी नधी खर्च करुन सिग्नल यंत्रणा सुरु होत नाही, तोपर्यंत “वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका घेण्या शिवाय नागरिकांना कोणताही पर्याय नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)