सिग्नलमुळे वाहतुक समस्या कमी होण्यास मदत होईल

राहुल द्विवेदी ः मनपा, सन फार्मा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जीपीओ चौकात सिग्नल
नगर – चांगले रस्ते, खड्डे, वाढत्या गाड्याचे प्रमाण यामुळे आज रस्ते अपघातात अनेकांनी प्राण गमावलेले आहे. यास मुख्यत्व कारणीभुत असते वाहतुक नियमांन पालन न करणे, यामुळेच अनेक अपघात होत असतात. हे अपघात थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. तेव्हाच आपण अपघात रोखू शकतो. थोडीशी घाईही आपल्या व दुसऱ्यांच्या जीववर बेतू शकते. यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. रस्त्यावरील सिग्नल हे वाहतुक नियंत्रणाचे काम करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने सिग्नलला थांबलेच पाहिजे. सिग्नलमुळे वाहतुकीत सुसूत्रा येत असल्याने प्रत्येकाने सिग्नलला थांबूनच गेले पाहिजे. आज या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या सिग्नलमुळे वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होईल. त्यासाठी सन फार्मा कंपनीने जे सहकार्य केले आहे, त्याचपद्धतीने जिल्ह्यातील कंपन्यानी सामाजिक दायित्व स्विकारुन विविध सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
मनपा व सन फार्मा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जीपीओ चौक येथे वाहतुक सिग्नलचा शुभारंभ मनपा आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, अति.आयुक्त विलास वालगुडे, सन फार्मा कंपनीचे सुनिल उत्तरवार, कैलास गुरव, विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक दत्ता कावरे, उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे, आदर्श रेड्डी, प्राजित नायर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, नगर शहरातील वाहतुकीचे कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. काही थोड्या नागरिकांच्या अडमुठेपणामुळे ही वाहतुक कोंडी होते. मनपाच्यावतीने यावर ठिकठिकाणी उपाय योजना केल्या आहेत. सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सुरळीत वाहतुकीसाठी सिग्नल महत्वाची भुमिका ठरते. नागरिकांनीही सिग्नलचा उपयोग करुन एक आदर्श नागरिक बनावे. सिग्नलसाठी सन फार्मा कंपनीने सहकार्य केले आहे. तसेच इतर ठिकाणचे सिग्नलही लवकरच सुरु होतील. त्यासाठी इतरही कंपन्यांची मदत घेतली जाईल, असे सांगितले.
याप्रसंगी सन फार्मा कंपनीचे सुनिल उत्तरवार म्हणाले, नगर शहरातील वाहतुकीत सुसूत्रता यावी यासाठी कंपनीने आपले सामाजिक दायित्व जपत जीपीओ चौकात सिग्नलसाठी सहकार्य केले आहे. त्यामुळे या भागातील वाहतुक सुरळीत होईल. पुढील काळातही कंपनीच्यावतीने अशाचप्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बाळासाहेब बोराटे यांनी सन फार्मा कंपनीच्यावतीने सिग्नल बसवून नागरिकांची मोठी सोय केली आहे. त्यामुळे पुढील काळात या भागात वाहतुकीची कोंडी होणार नाही. शहरातील विविध भागातील बंद पडलेले सिग्नलही सुरु व्हावेत, यासाठी आपण प्रयतक्‍ करु असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणकुमार बल्लाळ यांनी केले तर विलास सोनटक्के यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. सिग्नल बसविल्यामुळे नागरिकांच्यावतीने समाधान व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)