सिग्नलचे काही सेकंद… जीवावर बेतले

बालंबाल बचावलेल्यांनी कथन केला थरार

पुणे – काही सेकंदासाठी सिग्नल लागला… आणि जीवावर बेतले…होत्याचे नव्हते झाले… अशा जुना बाजार येथील शाहिर अमर शेख चौकातील घटनेच्या प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिल्या. हे सांगताना त्यांच्या अंगावर अक्षरश: काटे आले होते. हे सांगताना अक्षरशः त्यांच्या अंगावर काटा आले होते. तर, ‘होर्डिगच्या मधोमध मोकळ्या भागात रिक्षा राहिल्यामुळे मी थोडक्यात बचावलो. रक्त पाहताच मी बेशुद्ध झालो’, अशी हकीकत सांगताना रिक्षाचालकाचे हात-पाय लटपटत होते.

-Ads-

1. सिग्नलवर विविध वस्तुंची विक्री करणाऱ्या शीतल लक्ष्मण काळे म्हणाल्या, “पहिल्यांदा ज्यावेळी सिग्नल थांबला. त्यावेळी जास्त गाड्या होत्या. त्या गाड्या गेल्या, पुन्हा सिग्नल थांबला. त्यावेळी गाड्यांची संख्या तुलनेने कमी होती. जर, पहिल्या सिग्नलच्या वेळी घटना घडली असती. तर आणखी मोठी जीवितहानी झाली असती.’


2. बाळासाहेब थिटे म्हणाले, “या चौकात रिक्षाचे हुड शिवण्याचा माझा व्यवसाय आहे. होर्डिंग पडल्याचा आवाज आला. मी पळत सुटलो. तेथे गर्दी झाली होती. घटनेच्या ठिकाणी रक्त पडले. अवस्थ वाटू लागले. डोळे भरून आल्याचे सांगतानाच ते गहिरवले.


3. तर ज्यांनी मृतदेह उचलला ते गणेश गायकवाड म्हणाले, “मी पेंटर आहे. मंगळवार पेठ येथे माझे घर आहे. घटनेच्या वेळी मी अमर शेख चौकातून घरी चाललो होतो. अचानक घटना घडल्यानंतर तेथे धावत गेले. त्यावेळी गाड्यांवर होर्डिंग पडल्याचे पाहिले. मी आणि इतर लोकांनी मिळून त्यातून एक मृतदेह बाहेर काढला. जो पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. ते पाहून खूप वाईट वाटले. त्यानंतर काही वेळ काय चालले हे कळतच नव्हते. त्यानंतर सिग्नलवरील पोलीस आले. त्यांची पुढील कार्यवाही सुरू झाली.’


4. कुंभारवाड्याकडून नाना पेठकडे दुचाकीवर निघालेले बसवराज तिकोणे यांनी ही घटना पाहिली. ते म्हणाले, “ही घटना इतकी थरारक होती. ती पाहून अक्षरश: थरकाप उडाला. पाठीमागेही गाड्या होत्या. नशीब बलवत्तर म्हणून त्या गाडीवरील नागरिक वाचले.


5. सायकल व्यावसायिक ज्ञानेश्‍वर दरेकर म्हणाले, आवाज आल्यानंतर पळत घटनास्थळी गेलो. समोरील परिस्थिती पाहुन सुन्न बनलो. काही काळ काय चाललेय, हेही कळत नव्हते. तर तेथेच प्रत्यक्षदर्शी असलेले अतुल काळे म्हणाले, मी कामानिमित्त चौकात एका बाजूला उभा होतो. घटनेनंतर घटनास्थळी पळतच गेलो. तेथील परिस्थिती पाहून खूप भीती वाटली. तेव्हापासून अस्वस्थ वाटू लागले आहे. ते आताही वाटतेय.


6. रिक्षाचालक रामचंद्र बोंगनळी (रा. कोंढवा बु.) म्हणाले, मी आरटीओतून लायसन्सचे नूतनीकरण करून घरी निघालो होतो. सिग्नलमुळे चौकात थांबलो. त्यावेळी ओरडण्याचा आवाज आला. परंतू काही समजण्याच्या आतच होर्डिंग कोसळले. माझे नशीब चांगले म्हणून होर्डिंगच्या मधोमध असलेल्या मोकळ्या भागात रिक्षा राहिली आणि थोडक्‍यात वाचलो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)