सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारताने सैन्य वाढवले !

नवी दिल्ली : डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने अधिकचे सैन्य सीमेवर पाठवले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे. चीनकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने हे मोठे पाऊल उचलल्याचे  दिसत आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या सीमेवर भारताने अधिकचे सैन्य तैनात केले आहे. 

आतापर्यंत या भागात मोजकेच सैनिक भारताने तैनात केले होते. मात्र, चीन वारंवार युद्धाची धमकी देत असल्याने भारतानेही सीमेवर आपले सैन्य पाठवले आहे. दरम्यान, असं असलं तरीही डोकलाममध्ये मात्र, अधिक जवान तैनात करण्यात आलेले नाहीत. डोकलाम परिसरात रस्ता बनवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या या गोष्टीला भारतानं विरोध केला आहे. भूताननं देखील चीनला विरोध केला आहे.
‘डोकलाम हा तुमचा नाही तर आमचा भाग आहे.’ असं म्हणत भूतानने चीनला तोंडावर पाडले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही दिवसापूर्वी डोकलाम हा आपलाच भाग असून, भूताननेही मान्य केल्याचा दावा केला होता. त्यानंतर  भूतानने चीनला हे प्रत्युत्तर दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)