सिंह आणि वाघाच्या रस्त्यात येणाऱ्या उंदराचा निपात करू

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला : सुभाष देसाई, सुभाष देशमुख यांच्यासह सर्व मंत्र्यांना क्‍लीन चिट
मुंबई – राज्यात सिंह आणि वाघ एकत्र सत्ता राबवित आहोत. एवढेच नव्हे तर 2019 मध्येही वाघ आणि सिंह एकत्र येऊन सत्ता राखू, असा निर्धार व्यक्त करतानाच वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मूषक पूराणावरून लगावला. एमआयडीसीची आरक्षित जमीन खुली करण्याच्या निर्णयाबद्दल चौकशी करणाऱ्या बक्षी समितीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना “क्‍लीन चिट’ दिल्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावळ यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले.

विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर आरोपांची राळ उडाली होती. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या सर्व आरोपांचे खंडन करताना सर्व मंत्र्यांना क्‍लीन चिट दिली. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 75 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन वाटाघाटीतून केवळ 25 कोटी रुपयांची कर्जफेड बॅंकेकडून मंजूर करून घेतल्याच्या आरोप आहे.

याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी पाटील यांनी ते कर्ज घेतले नव्हते तर ते केवळ जामीनदार असल्याचे सांगितले. एका कृषी प्रक्रिया संस्थेच्या कर्जाला संभाजी पाटील यांनी हमी दिली होती व रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांनुसारच तडजोड झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिकेची जागा बळकावून त्यावर बंगला बांधल्याचा आरोप आहे. हा आरोप फेटाळून लावताना 2004 साली मध्येच गुंठेवारी कायद्यानुसार ही जागा नियमित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले. पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्या तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीने तोरणमाळ येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टवर कब्जा केल्याचा आरोप आहे. या आरोपांचे खंडन करताना सदर रिसॉर्ट भाडेतत्वाने चालवण्यात देण्यात आलेले असून जयकुमार रावळ या कंपनीचे संचालक वा भागीदार नाहीत असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)