सिंहगड रस्त्यावर मेट्रो प्रकल्प अडचणीचाच

दुसऱ्या टप्प्यात विचार करणार : महामेट्रोचे पत्र

पुणे – गेल्या दशकभरात प्रचंड नागरीकरण झाल्याने सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता अथवा पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मेट्रो प्रकल्पाचा स्वारगेट ते धायरी असा विस्तार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तरीही या प्रकल्पासाठी या भागातील नागरिकांना आणखी पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पार्तंगत पहिल्या टप्यात शहरातील दोन मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे स्वारगेट ते खडकवासला या मेट्रो मार्गाचे काम पुढच्या टप्यात विचार केला जाईल, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्याला कोणताही पर्यायी रस्ता नाही. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले असल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागाला पर्यायी रस्ते अथवा इतर पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधीची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर सिंहगड रस्त्यांवरील भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका मंजुषा नागपुरे, यांनी या मार्गांचा सविस्तर आराखडा (डीपीआर) करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. त्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, महामेट्रोने मात्र या मार्गांवर लगतच्या काळात मेट्रोचा नारळ फुटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रम्हण्यम्‌ यांनी चरवड यांनी पहिल्या टप्यातील मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या टप्यात हे काम हाती घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पत्र पाठविले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम हे 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट असल्याने सिंहगड रस्तावासियांनी मेट्रोसाठी किमान आणखी पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)