सिंहगड रस्त्यावर फक्‍त एकाच ठिकाणी सीसीटीव्ही

निर्णय घ्या : नागरिकांच्या सुरक्षेकडे महापालिका, पोलिसांचे दुर्लक्ष

पुणे – सतत वर्दळ असणाऱ्या सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलापासून पुढे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिक तसेच सामाजिक संघटना करत आहेत. या मर्गावर राजारामपूल परिसर वगळता कोठेही सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.

सिंहगड रस्ता परिसर वेगाने विकसित होत असून धायरीपर्यंत मोठया प्रमाणात नागरीकरण झाले आहे. तसेच वडगाव, सिंहगड कॉलेज परिसरातही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून लहान-मोठ्या गुन्ह्यांसह, सोनसाखळी चोरी, अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत या भागातील सुरक्षेसाठी तसेच सुरक्षेला बाधा पोहचविणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर सीसीटीव्ही असणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिका तसेच वाहतूक पोलिसांनी फक्‍त रामाराम पुलावरच ही यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे त्या पुढील भागात एखादा अपघात अथवा गुन्हे घडल्यास शोधासाठी पोलिसांना मदत मिळत नाही. त्यातच सिंहगड रस्त्याला फनटाईमपासून कालव्याकडेने जनता वसाहतीपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध झाला असून संतोष हॉल चौक, माणिक बाग, गंगा भाग्योदय चौक, वडगावकडे जाणारा नवीन कालव्यावरील पूल असे वेगवेगळे रस्तेही तयार झालेले आहेत. ही बाब लक्षात घेऊन या सर्व ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

सिंहगड रस्त्यावर सनसिटी, कालव्यावरील नवीन रस्ता, कात्रज बाह्यवळण मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहने या भागात येतात. ती पुढे राजारामपुलाकडे जात नाहीत. अशा स्थितीत या भागातील सुरक्षेसाठी संतोष हॉलसह पुढे धायरीपर्यंत प्रत्येक चौकात सीसीटीव्ही बसविणे आवश्‍यक आहे.
– किरण काळोखे,साईराज प्रतिष्ठान.


सिंहगड रस्त्यासह त्याला जोडणाऱ्या इतर रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्यास अनेक गैरप्रकारांना आळा बसण्यासह पोलीस तपासासाठीही मदत होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही व्हावी. त्यासाठी गरज भासल्यास या भागातील सामाजिक संस्था तसेच मंडळेही मदत करण्यास तयार असतील.
– निखील बाणखेले, अध्यक्ष, अखिल आनंदनगर मित्रमंडळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)