सिंहगड रस्त्यावर आढळला जिवंत बॉम्ब

डीएसके रस्त्यावरील घटनेने खळबळ


“बीडीडीएस’ पथकाने ताब्यात घेतला बॉम्ब

पुणे – कचरावेचक कामगाराला जिवंत बॉम्ब आढळल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास धायरी परिसरातील बारंगणी मळ्यात डीएसके रस्त्यावर घडली. दरम्यान, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने हा बॉम्ब ताब्यात घेतला. या घटनेने सिंहगड रोड आणि धायरी परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

गुरूवारी दुपारी साडेबारा वाजता पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी भारत चव्हाण, मुकादम शंकर रणदिवे, हेमंत पवार, गणेश वाघमारे राजेंद्र शिंदे, प्रीतम मळेकर हे नेहमीप्रमाणे डीएसके रस्त्यावर स्वच्छता करत होते. दरम्यान, त्यांना संशयास्पद वस्तू दिसल्याने त्यांनी घाबरून तत्काळ आरोग्य निरीक्षक अजय गजधाने यांना कळविले. गजधाने यांनी गांभिर्य ओळखून सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचारण केले. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बैसाने, प्रशांत शिंदे, शिर्के,कांबळे, सपकाळ यांनी हा जिवंत बॉम्ब ताब्यात घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, सागर पडवळ, राकेश भामरे, सुप्रिया जगताप, सहायक पोलीस फौजदार अशोक महाडिक, पोलीस हवालदार संतोष सावंत, राजेश गोसावी, अमर कोरडे, सुदाम वावरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती तत्काळ नियंत्रणाखाली आणली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)