सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून दिलासा

पर्यायी रस्त्यातील आणखी एक अडथळा दूर

पुणे : सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता ठरणाऱ्या विश्रांतीनगर ते फनटाईमपर्यंतच्या रस्त्यातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. विश्रांतीनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याकडे वळताना अडथळा ठरणारे स्वच्छतागृह शुक्रवारी काढण्यात आले. त्यामुळे सिंहगड रस्त्याला आणखी पर्याय वाहन चालकांना उपलब्ध होणार आहे.
सिंहगड रस्त्याला सध्या कोणताही पर्याय नाही. त्यामुळे या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेकडून स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपूरे, ज्योती गोसावी, नगरसेवक श्रीकांत जगताप आणि नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या मदतीने पु. ल. देशपांडे उद्यान ते फनटाईमपर्यंत कालव्यावरून रस्ता प्रस्तावित केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रस्त्याचे काम फनटाईमपासून विश्रांतीनंतरपर्यंत झाले असून त्याचा वापर सुरू आहे. मात्र, सिंहगड रस्त्यावरून विश्रांतीनगरकडे वळताना या रस्त्याचे रुंदीकरण झाले तरी, या रस्त्याकडे वळताना एक स्वच्छतागृह अडथळा ठरत होते. त्यामुळे नगरसेविका नागपूरे यांच्या निधीतून या स्वच्छतागृहाच्या शेजारी नवीन स्वच्छतागृह उपलब्ध करून देऊन जुने स्वच्छतागृह काढण्यात आले आहे. परिणामी विश्रांतीनंतरकडे जाण्यासाठी मोठा रस्ता उपलब्ध होणार असून विठ्ठलवाडी ते फनटाईमपर्यंत मुख्य सिंहगड रस्त्यावर येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)