सिंहगड घाट रस्ता 5 सप्टेंबर पासून सुरू होणार

खेड शिवापूर- सिंहगड घाट रस्ता 30 जुलैपासून दरड कोसळल्याने बंद करण्यात आला होता. या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे आले असून हा रस्ता पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनद्वारे मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी 5 सप्टेंबरपासून हा घाट रस्ता खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे कोंढणपूरचे माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले यांनी सांगितले.
30 जुलै रोजी या सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली होती. यावेळी सिंहगडवर जाणारी वाहातूक ठप्प झाली होती.या दरम्यान प्रशासनाने घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पर्यटकांची आणि किल्ल्यावरील व्यावसयिकांची एक प्रकारची गैरसोय यामुळे झाली होती. या घाट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून, हा रस्ता सुरू करण्याबाबत किल्ल्यावरील व्यावसायिक आणि सिंहगड परिसरातील ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृवाखाली जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन सिंहगड घाट रस्ता खुला कराव, अशी मागणी निवेदनद्वारे केली. या वेळी 5 सप्टेंबर 2017 रोजी सदरच्या घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राव यांनी दिले असल्याचे कोंढणपूर येथील माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले यांनी सांगितले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष काका चव्हाण, कोंढणपपूरचे माजी सरपंच विश्वनाथ मुजूमले, कल्याणचे माजी सरपंच राजेंद्र डिंबळे, सिंहगड घराचे माजी उपसरपंच तानाजी चव्हाण, राजेंद्र पवार, बाबाजी मुजुमले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)