सिंहगड घाट रस्ता अडीच महिने बंद

दुरुस्तीचे काम : पर्यटकांचा होणार हीरमोड

पुणे – सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता पर्यटकांसाठी बंद करण्यात आला असून रस्त्याची कामे अडीच महिने सुरू राहणार आहे. सिंहगडाचा घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले असून त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कार्यवाही सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंहगडाच्या पायथ्यापासून काही किलोमीटरपर्यंतचा रस्ता चांगला आहे. मात्र, वळणावर मोठे खड्डे चुकवत वाहन चालकांना गडापर्यंत जावे लागते. शनिवार-रविवारी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर सिंहगडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याचे डांबरीकरण आणि आवश्‍यक तेथे सिमेंट क्रॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. वनविभाग आणि वनसंरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राम यांच्या आदेशानुसार हा रस्ता अडीच महिने बंद राहणार आहे. कामाबाबतच्या सर्व परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)