सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोणावळा, (वार्ताहर) – येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीच्या (माहिती तंत्रज्ञान) तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेज कॅम्पस मधील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक अरुण वर्पे (वय 20, मूळ रा. वारुळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी लौकीक राजेंद्र लौंध (वय 20, सध्या रा. सिंहगड कॉलेज, मूळ राहणार कोसुंब, जिल्हा रत्नागिरी) याने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार सोमवारी (दि. 26) सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी प्रतीक याने तो रहात असलेल्या राजगड वसतिगृहातील खोली नं. 35 मध्ये अज्ञात कारणाने खोलीमधील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीसचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजित ननावरे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)