सिंहगड एक्‍स्प्रसेच्या ठाण्यातील थांब्याला मुदतवाढ

पुणे – पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्‍स्प्रेसच्या ठाणे येथील थांब्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार 14 ऑगस्टपर्यंत म्हणजेच आणखी दीड महिना ही मुदतवाढ देण्यात आली असून यापुर्वी प्रायोगित तत्वावर सहा महिन्यांसाठी हा थांबा देण्यात आला होता, अशी माहिती रेल्वे प्रसासनाच्यावतीने देण्यात आली.

सिंहगड एक्‍स्प्रेस सकाळी 6.05 वाजता पुणे स्थानकावरून सुटून ठाणे येथे 9.09 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे येथे दोन मिनिटांचा थांबा दिला गेला आहे. सध्या सिंहगड एक्‍स्प्रेसला शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, खंडाळा, कर्जत, कल्याण, दादर येथे थांबा देण्यात आला असून ठाण्याच्या थांब्याला आणखी मुदतवाढ मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)