सिंहगड इन्स्टिट्यूटची थकबाकी अखेर चुकती

न्यायालयाच्या दणक्‍याने सरकार नरमले


कर्मचाऱ्यांना दिलासा, थकित पगार मिळणार

मुंबई – पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्युटच्या विविध महाविद्यालयांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फ्री-शिप, शिष्यवृत्तीच्या थकबाकीची सुमारे 117 कोटी 54 लाख रुपये अखरे राज्य सरकारने जमा केली. न्यायालयाच्या दणक्‍यानंतर ही थकबाकी जमा झाल्याने कर्मचाऱ्यांच्या थकित पगार मिळण्याचा मार्ग सुखकर झाला आहे.

पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थच्या विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना सुमारे 17 महिने वेतन न मिळल्याने सुमारे 500 प्राध्यपकांच्या वतीने ऍड. सुरेश पाकळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ट्युशन फीस आणि शिष्यवृत्तीचे सुमारे 117 कोटी 56 लाख रूपये सरकार थकित असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देता येत नसल्याचा मुद्दा सिंहगड संस्थेने पुढे केला.

याची दखल घेऊन न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने ही थकित बाकी भरण्याचे आदेश दिले. तसेच या रक्कमेतून शिक्षक आणि कर्मचाऱ्या पगार द्या, असे निर्देशही दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने ही थकित रक्कम जमा केल्याची माहिती आज न्यायालयात देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)