सिंधू, समीर यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

कोवलून, दि. 14- ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती, भारताची स्टार महिला एकेरी बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि समीर वर्मा यांनी हॉंगकॉंग ओपन वर्ल्ड टूर स्पर्धेतील पहिल्या फेरीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधूने थायलंडच्या निचोन जिंदापोल हिचा 21-15, 13-21, 21-17 असा तीन सेटमध्ये पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये तिने चांगली सुरुवात केली. त्यात तिने सुरुवातीला संयमी खेळ केला. तिने नेहमीप्रमाणे मोठ्या रॅलीज खेळण्यावर भर दिला आणि विरोधी खेळाडूवर वर्चस्व मिळवले. तिने पहिला सेट 21-15 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये थायलंडच्या निचोन जिंदापोलने आपल्या खेळात बदल केले. तिने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सिंधूला दुसऱ्या सेटमध्ये निष्प्रभ ठरवले. मोठ्या रॅलीज खेळण्यापेक्षा तिने आक्रमक फटके खेळण्यावर जास्त भर दिला आणि त्यात ती यशस्वी देखिल झाली. त्यामुळे तिने दुसरा सेट 21-13 असा जिंकला.

-Ads-

सामन्याचा निकाल तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये झाला. दुसऱ्या सेटनंतर पी.व्ही. सिंधूशी प्रशिक्षकांनी काहीवेळ चर्चा केली. त्यानंतर मैदानात आलेल्या सिंधूने पुन्हा लय मिळवली. तिने संयमी खेळाचे प्रदर्शन करत आघाडी राखण्यावर लक्ष दिले. विरोधी खेळाडूला फारशी संधी न देता तिने तिसरा आणि निर्णायक सेट 21-17 असा जिंकला. स्पर्धेत तिचा पुढील सामना कोरियाच्या संग जी ह्युन शी होणार आहे. या कोरियन खेळाडूंसह अगोदर झालेल्या एकूण सामन्यात 8 विजय आणि 5 पराभव तीने स्विकारले आहेत.

दुसऱ्या सामन्यात, स्वीस ओपन आणि हैद्राबाद ओपन जिंकणाऱ्या समीर वर्माने थायलंडच्याच सुप्पान्यू अविंगसनोन याचा 21-17, 21-14 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमधे प्रतीकार करणारा सुप्पान्यू दुसऱ्या सेटमधे प्रतीकार करु शकला नाही. त्यामुळे समीर या सामन्यात सहज विजयी झाला. त्याचा पुढचा सामना चीनचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू चेन लॉन्ग याच्याशी होणार आहे. तर अन्य सामन्यात साई प्रणीतला थायलॅंडच्याच खोसीत फेतप्रादेब विरुद्ध धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा सामना 62 मिनिटे चालला आणि त्यात प्रणीतला 21-16, 11-21, 15-21 असे पराभूत व्हावे लागले आहे. या आगोदर खोसीत फेतप्रादेब विरुद्ध झालेले तीन्ही सामने प्रणीतने जिंकले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)