सिंधू पाणी करार फोल ठरवल्याबाबत पाकची भारतावर टीका

इस्लामाबाद – “सिंधू पाणी करार’ विफल ठरवल्याबाबत पाकिस्तानने भारतावर आगपाखड केली आहे. हा विषय आपण जागतिक बॅंकेकडे उपस्थित केला असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 साली “सिंधू पाणी करार’झाला होता. या करारासाठी जागतिक बॅंकेच्यामदतीने तब्बल 9 वर्षे वाटाघाटी झाल्या होत्या. या करारावर जागतिक बॅंकेच्याही स्वाक्षऱ्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील पाणी वाटपाबाबतचे मतभेद दूर करून दोन्ही भागातील लोकांना लाभ होण्यासाठी जागतिक बॅंकेने दोन्ही बाजूंच्या आग्रहास्तव या करारामध्ये पुढाकार घेतला होता.

भारताने “सिंधू पाणी करार’ विफल ठरवला आहे. तंट्यावर तोडगा काढण्याच्या उपाय योजना सध्या निरुपयोगी झाल्या आहेत. किशनगंगा आणि रॅटल उर्जा प्रकल्पांसाठी पाणी मिळण्याचा दावा भारताने केला आहे, असे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते मोहम्मद फैजल यांनी साप्ताहिक वार्तालापाच्या कार्यक्रमात सांगितले. वादावर केवळ चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो, असे पाकिस्तानने पहिल्यापासून म्हटले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी न्यायिक समिती स्थापन करणे आणि डॉक्‍टरांच्या आदान प्रदान करण्याचा दोन्ही बाजूंचा प्रस्ताव होता, असेही त्यांनी सांगितले.

जोपर्यंत प्रत्यक्ष ताबा रेषेवर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार थांबत नाही, तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही, असे राजनाथ सिंह यांनी अलिकडेच म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)