सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण

File photo

 बीडब्ल्युएफ विश्‍वविजेतेपद बॅडमिंटन स्पर्धा 
नवी दिल्ली – बीडब्ल्युएफ विश्‍वविजेतेपद बॅडमिंटन स्पर्धा चीनमध्ये 12 ते 16 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताला पी व्ही सिंधुकडून अपेक्षा आहेत. मात्र या स्पर्धाच्या मानांकनाच्या यादीत सिंधूची घसरण झाली आहे. या स्पर्धेत सिंधू एका स्थानाने घसरून पाचव्या स्थानी फेकली गेली आहे. गुरुवारी बीडब्ल्युएफ विश्‍वविजेतेपदया स्पर्धेसाठी मानांकनाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जपानची नोझुमी ओकुहरा ही स्पर्धेची विजेती ठरली होती. त्यामुळे तिने तीन स्थानांनी झेप घेतली. परिणामी सिंधूची एका स्थानाने घसरण होऊन ती पाचव्या स्थानी गेली. तसेच ताई झू यिंग आणि कॅरोलिना मरीन या दोघीही एक एक स्थानाने खाली घसरल्या असून त्या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत. दरम्यान, जागतिक क्रमवारीत मात्र सिंधू दुसऱ्या स्थानी कायम आहे.
पुरुष एकेरीमध्ये बॅडमिंटनपटू समीर वर्मा हा भारताची एकमेव आशा आहे. या स्पर्धेच्या मानांकनात त्याला आठवे स्थान मिळाले आहे. पण एचएस प्रणॉय आणि किदम्बी श्रीकांत हे आघडीचे खेळाडू पहिल्या 20 मध्येही नाहीत त्यामुळे पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंची घसरण पहायला मिळत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)