सिंधुदुर्ग विमानतळावर आज पहिले विमान उतरणार ; सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नांना यश 

नवी दिल्ली: कोकणवासीयांची विमानतळाची मागणी अखेर गणेशोत्सवाच्या दिवशी प्रत्यक्षात येत असून सिंधुदुर्ग विमानतळावर आज दि. 12 सप्टेबर रोजी परीक्षण तत्वावरील पहिले विमान उतरणार आहे. विमान वाहतूक, वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गात विकानसेवा सुरू करण्याचा मुद्या रेटून लावला होता. यात त्यांना यश आले आहे.
परीक्षण तत्वावरील पहिले विमान श्रीगणेशाच्या मंगल मूर्तीसह उद्या सकाळी 11 च्या सुमारास सिंधुदुर्गातील पारूळे चिपी विमानतळावर प्रथमच उतरेल.
उद्या विमानाचे परीक्षण असल्याने त्यात वैमानिकांसह केबीन क्रू असेल. विमानतळा संदर्भातील अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येथून लवकरच नियमित प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
प्रभू यांनी सांगितले की, या विमानतळाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. चिपी विमानतळाहून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. मात्र प्रवाशांची सुरक्षा सर्वोपरी असून त्याच्याशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही असेही प्रभू यांनी आवर्जून नमूद केले. उद्या सिंधुदुर्ग विमानतळावरील या पहिल्या विमानाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग विमानतळाबाबत आवश्‍य ते ओएलएस सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. विमानतळावरील 2500 मीटर्स लांबीच्या धावपट्टीचे काम बांधून पूर्ण झाले आहे. तीन वाहनतळांची उपलब्धता येथे असेल व त्यांचेही काम पूर्णत्वास आहे. 400 प्रवासी संख्येला सामावून घेण्याच्या क्षमतेची विमानतळ इमारत बांधून पूर्ण झाली आहे. एटीसी टॉवरचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आयएलएस व व्हीओआर यंत्रणांचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी विमानतळ व्यवस्थापन कंपनीला दिलेल्या आहेत.
सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकण विभाग उर्वरीत देशाशी केवळ जोडला जाणार नाही तर पर्यटनालाही मोठी चालणा मिळणार आहे. कोकणात आणखी दोन विमानतळांचे कामही वेगाने सुरू असून त्यानंतर हा भाग उत्तर कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व गोव्याच्या बहुतांश भागाबरोबर हवाई मार्गाने थेट जोडण्याचा उद्देश पूर्ण होईल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)