सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर पहिले विमान उतरले

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर गणेशोत्वापूर्वीच पहिले विमान गणपती बाप्पांना घेऊन उतरले. यावेळी सिंधुदुर्गवासियांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सिंधुदुर्गवासियांच्या हक्काच्या विमानतळाचे स्वप्न पूर्ण झाले आहे चिपी विमानतळावर 12 आसनी विमान गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन उतरले. यावेळी विमान उतरण्याचा क्षण कैद करण्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी मोठी गर्दी केली होती.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गणेश चतुर्थीपूर्वीच चिपी विमानतळ वाहतुकीस खुला केला जाणार असल्याचे सांगितले होते. यावरून कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी हे विमान खासगी असल्याचे सांगत जर सरकारी असेल तर केसरकर यांनी स्वत: या विमानातून यावे, असे आव्हान दिले होते.

या सर्व आरोपप्रत्यारोपांच्या धुरळ्यामध्ये अखेर आज चिपी विमानतळावर 12 आसनी विमान गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन उतरले. हे विमान मुंबईहून नाही तर चेन्नईहून चिपी विमानतळावर दाखल झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)