सिंधी बांधवांच्या घोषणांनी कॉंग्रेस भवन दणाणले

राष्ट्रगीतातून सिंध शब्द वळगण्याच्या प्रस्तावाचा निषेध 


सिंधी समाजाचा पुढाकार

पुणे- ईशान्येकडील कॉंग्रेस पक्षाचे खासदार रिपुण बोरा यांनी राष्ट्रगीतातून सिंध शब्द वगळण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाचा पुण्यातील सिंधी समाजाच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे निषेध केला. रिपुन बोरा हाय हाय, भारत माता की जय, सिंधी बोली अमर रहे अशा घोषणा देत सिंधी बांधवांनी कॉंग्रेस भवन दणाणून सोडले. तसेच राष्ट्रगीतातून “सिंध’ शब्द कोणत्याही परिस्थितीत वगळू नये, या मागणीचे निवेदन त्यांनी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना दिले. बागवे यांच्या वतीने कार्यालयीन सचिवांनी हे निवेदन स्वीकारले.

भारतातील सिंधी बांधवाना वेगळे राज्य नसल्याने राष्ट्रगीतातून सिंध हा शब्द वगळण्याची मागणी गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे खासदार रिपुण बोरा यांनी केली होती. केवळ प्रांत नसल्यामुळे जर अशा प्रकारची मागणी केली जात असेल तर नाईलाजाने सिंधी समाजालाही वेगळ्या प्रांताची मागणी करावी लागेल, असे सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आजपर्यंत सिंधी समाजाने वेगळ्या राज्याची कधीही मागणी केलेली नाही. परंतु, या वक्‍तव्याने वेगळ्या राज्याच्या विचारांना खतपाणी घातले जाईल. सिंधी भाषिक हे व्यापारी समाज आहे. भारताच्या जडणघडणीत सिंधी समाजाचा मोठा वाटा आहे, असे दीपक रमनानी यांनी सांगितले. पुण्यातील सिंधी समाजाच्या संस्था प्रमुखांच्या बैठकीत याबाबत खासदार रिपून बोरा यांच्या वक्‍तव्याचा निषेध करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. भारतीय सिंधू सभा, सिंधू सेवा दल, भारतीय सिंधी सेवा संगम, सिंधी समाज पुणे या संस्थांनी हा ठराव पारित केला आहे.

यासंदर्भात कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनाही सिंधी बांधव भेटणार असून, सिंध शब्द वगळू नये, असे निवेदन देणार आहोत, असे विनोद रोहानी यांनी सांगितले.
याप्रसंगी कराची एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक रमनानी, भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष सुरेश हेमनानी, सिंधी समाज पुणेचे अध्यक्ष हरेश हेमराजानी, सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, सिंधजी पुकार साप्ताहिकाचे संपादक विनोद रोहानी, राजेश शाजवला राजू लुल्ला, जितू अडवाणी, गोपीचंद सचदेव, ज्ञान पंजाबी, सुरेश रोहरा, डॉ. धर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)