सिंधी बांधवांची आराध्य वैष्णोदेवी

पिंपरी – शहरातील वैष्णो देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सावानिमित्त भावीक मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शहराच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराची स्थापना 16 ऑक्‍टोबर 1193 साली हरिश मूलचंदानी यांनी केली. जम्मू-कश्‍मिरमध्ये त्रिकूट पर्वतावर वैष्णो देवीचे मूळ स्थान असून त्या पार्श्‍वभूमीवर या मंदिराची बांधणी येथे करण्यात आली आहे.

जम्मू-कश्‍मिरमध्ये त्रिकूट पर्वतावर असलेल्या वैष्णोदेवी मंदिराया पार्श्‍वभूमीवर मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर त्रिकूट पर्वतावर असलेल्या या मंदिराला साजेसा देखावा आतमध्ये करण्यात आला आहे. मोठाले दगड ठेऊन त्याला पर्वतासारखा आकार देण्यात आला असून त्यामधून अविरत पाणी वाहत असते. तसेच या पर्वतरूपी दगडांच्या कुशीत विविध झाडे देखील लावण्यात आली आहेत. त्यामुळे या देखाव्याला बघितल्यावर भाविकांना जम्मू-कश्‍मिरमधील त्रिकूट पर्वतावर उभे असल्याचा भास होतो.

-Ads-

मंदिराच्या प्रेक्षागृहामधून प्रवेश केल्यावर मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी गुहेची निर्मिती केली आहे. गुहा पार केल्यांनतर आतमध्ये मातेचे दर्शन भाविकांना घेता येते. छोटीसी गुहा केली असून तिला त्रिकूट पर्वतावर असलेल्या मंदिराचा साज दिला आहे. यामुळे गुहेत पाऊल टाकताच पाण्याचा स्पर्श होतो. गर्दी आणि अंधूक प्रकाशातून गुहेतून प्रवेश करत देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी पाच मिनिटांचा तरी अवधी लागतो. समोरच देवीची मनमोहक मूर्ती पाहून भाविकांना मंत्रमुग्ध होतात. तिथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

अष्टमीच्या दिवशी मंदिरामध्ये हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याच दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आहे. यामुळे भावीक येथे देवीचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. नवमी झाल्यानंतर मातेच्या घटाचे विसर्जन आळंदी येथे करण्यात येत असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी अशोक दखनेजा यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)