सिंधी बांधवांचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश व्हावा!

पिंपरी – सिंधी समाजाला गुजरातमध्ये अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यात आला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील समाज बांधवांचाही अल्पसंख्याकांमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी सिंधी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित मन्याल यांनी पिंपरी येथे बोलताना केली.

राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद व सेंट्रल पंचायत पिंपरी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील आर्य विद्यामंदिर शाळेत गुरुवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक ढब्बु आसवानी, संदीप वाघेरे, सामाजिक कार्यकर्ते अजित मन्याल, दिव्या बजाज, भावना भाटीया, संजय ताहिलानी, नरेंद्र कुकरेजा, जगदिश वासवानी आदी उपस्थित होते. यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सिंधी समाजातील 96 वर्षांच्या सदोरीबाई जमतानी आणि 90 वर्षांचे रामचंद्र रामनानी या ज्येष्ठांना यावेळी गौरविण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमास सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील सिंधी समाज बांधवांचा अल्पसंख्यांकांमध्ये समावेशासाठी केंद्र व राज्य सरकारकडे विविध माध्यमातून प्रसंगी आंदोलन उभारुन पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मातृभाषा दिनानिमित्त आईचे महत्त्व या विषयावर आर्य विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकीता रामनानी यांनी केले. दिव्या बजाज यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन बेद, नारायण नाथानी, अजित खंडावानी, मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, गिताली आसवानी, रचना मेघराजानी, प्रिया सबनीस, सपना केवलरामानी, सोनम केसवानी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)