सिंडिकेट बॅंकेकडून कर्ज मेळावा 

मेळाव्यास लघुउद्योजकांकडून उत्तम प्रतिसाद 
पुणे: राष्ट्रीयकृत सिंडिकेट बॅंक क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांनी औद्योगिक गुंतवणूक व्हावी व औद्योगिक विकासास चालना मिळावी या उद्देशाने नुकताच ग्राहकांसाठी ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर चखऊउ, चिंचवड, पुणे येथे दि. 30 ऑगस्ट 2018 रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
हा मेळावा एम.एस.एम. ई. लोन मेळावा (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कर्ज मेळावा) या क्षेत्रावर भर देणारा होता. याप्रसंगी डेप्युटी डायरेक्‍टर ऑफ डिस्ट्रिक्‍ट इंडस्ट्रीज़ सेंटर अर्चना शर्मा या प्रमुख पाहुण्या होत्या. तसेच जनरल मॅनेजर सिंडिकेट बॅंक, झोनल ऑफिस मुंबईचे टी मणिवन्नन, क्षेत्रीय कार्यालय पुणे येथील उपमहाप्रबंधक आर कन्नन, चीफ मॅनेजर, लोन सेंटर पुणे नागचलपती राव उपस्थित होते.
त्याचबरोबर पुणे शहरातील बॅंकेचे 18 शाखा प्रमुख व ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी टी मणिवन्नन यांनी बॅंकेच्या एम. एस. एम. ई. आणि इतर योजनांविषयी माहिती दिली तसेच नवीन उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली, अर्चना शर्मा यांनी उद्योजकांसाठी ज़िल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी, एकूण 62 एम. एस. एम. ई. लोन च्या पूर्वमंजूर पत्रांचे वाटप करण्यात आले. या एम एस एम ई कर्ज मेळाव्याला सिंडिकेट बॅंकेच्या ग्राहकाकडून आणि नवीन उद्योजकांकडून उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामुळे लघु उद्योजकांकडून कर्जाचा वापर वाढेल आणि त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)