सिंचन घोटाळा : चौकशीला पूर्ण सहकार्य करेल – अजित पवार 

राज्यभरात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हे कारणीभूत असल्याचे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी नागपूर खंडपीठात सादर केले. यावर आज अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून मी चौकशीला  पूर्ण  सहकार्य करेल, असे अजित पवारांनी सांगितले. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले कि, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून नागपूर खंडपीठात खटला सुरु आहे. त्यामुळे याबद्दल मी फार  बोलणार नाही. माझ्या एखाद्या वक्तव्यामुळे तपास प्रक्रियेत बाधा येऊ नये याची मी काळजी घेत आहे. माझ्या वकिलांनीही तशा सूचना केल्या आहेत. याप्रकरणी वेळोवेळी चौकशीला गेलो. मी चौकशीला सहकार्य केले, आजही करतोय आणि उद्याही करणार. सरकार त्यांचे काम करतंय असे दिसतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

-Ads-

दरम्यान, भाजप ऐन निवडणुकांच्या आधी आकसाने ही कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)