सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्व कामे लवकरच सुरू करणार – कांबळे

हिंगोली : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या संदर्भातील सर्व कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.लिंबाळा तांडा येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकूळे माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे सेनगांवचे नगराध्यक्ष अभिजीत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रामरतन शिंदे, सभापती हरिशंचद्र शिंदे, नारायण राठोड आदी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास, शेती साठी पाणी, वीज आणि मजबुत रस्ते ग्रामीण भागातील लोकांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असुन लवकरच कामे सुरु केली जाणार आहेत. ग्रामस्थांनी शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहकार्य करावे तसेच आपआपल्या परिसरात झाडे लावून ती काळजीने वाढवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्हयातील शेतकऱ्यांना टप्याटप्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)