सिंगापूर-भारतातील द्विपक्षीय संबंध दृढ

सिंगापूरच्या कौन्सिल जनरल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: नागपूर येथील लॉजिस्टिक पार्क, नवी मुंबईतील एकात्मिक औद्योगिक परिसरात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून सिंगापूरच्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी या भागात पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आर्थिक सहकार्य व गुंतवणूक या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून यावेळी चर्चा झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंगापूरचे मुंबईतील वाणिज्य दूत गॅविन चाय यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री हे मुंबई भेटीवर जानेवारीमध्ये येणार आहेत. या भेटीचे निमंत्रण किट यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. यावेळी आर्थिक विकास बोर्डाचे प्रादेशिक संचालक जसपीर अंग, इंटरप्राईज सिंगापूरचे केंग फांग, उप वाणिज्य दूत अमिन रहिम आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सिंगापूर संयुक्त समितीमधील सहकार्य तसेच सिंगापूर व महाराष्ट्रातील संबंध वाढविण्याबद्दल यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूरचे भौगोलिक स्थान हे लॉजिस्टिक पार्कच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून वस्तू व सेवा कर कायद्यामुळे या स्थानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या भागात होणाऱ्या जेएनपीटीच्या सॅटेलाईट पोर्टमुळेही लॉजिस्टक क्षेत्राला चालना मिळणार आहे. सिंगापूरमधील लॉजिस्टक क्षेत्रातील कंपन्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामुळे पुढील काळात नवी मुंबई हे राज्याच्या विकासाचे प्रमुख ठिकाण होणार आहे. त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. पुण्यामध्ये सिंगापूरमधील विविध कंपन्या आहेत. पुण्याच्या मास्टर प्लॅनमध्ये या कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

किट म्हणाले, गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील उद्योग तसेच पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे सिंगापूरमधील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीस उत्सुक आहेत. पुण्यात सुमारे मिलियन डॉलरची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे दोन हजार रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सिंगापूरचे मंत्री महाराष्ट्रात येणार असून यावेळी विविध सामंजस्य करार होणार आहेत. त्यामध्ये गृह निर्माण विभागाबरोबरील कराराचा समावेश आहे. कौशल्य विकास व क्षमता विकासासाठी सिंगापूर शासन महाराष्ट्राबरोबर काम करू इच्छित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)