सिंगापूरच्या शिष्टमंडळाला उद्योगनगरीची भूरळ

पिंपरी – सिंगापूर स्मार्ट सिटीच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देऊन विकास कामांची माहिती घेतली. येथील विकास प्रकल्पाचे कौतुकही त्यांनी केले.

महापौर राहुल जाधव यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण होते.

या शिष्टमंडळामध्ये एनवायरसेन्स लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शैलेश खरकवाल, एन्वरकॉम युनिटेक सिंगापूर प्रा. लि. चे संचालक टी. एस. वेलान, आयटी रिसर्च हेड लि मिंग होंग, एचव्हीएस इंजिनिरिंग लि. चे कार्यकारी संचालक अलेक्‍स चॉऊ, मास्टॉन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी संचालक बेंजामिन ओंग, नेक्‍सटान प्रा.लि. चे मुख्य विकास अधिकारी विल्फ्रेड टान, स्टीफन हो, लाव आगरवाल, दीपक पिट्टा, स्टीफन लेऑ, परविंदर सिंग भासिन, जॉन फंग, ऍलन फुंआ, अतुल भाकाय, एडविन चॉव, केंग फंग गो, केनी ओंग, वालारी चांग, हं लीन छुआ, लिना वानवानी आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)