सिंगापूरच्या मादाम तुसां म्युझियममध्ये अनुष्काचाही पुतळा 

अनुष्का शर्माने आपल्या ऍक्‍टिंग स्कीलच्या आधारे बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या अभिनयामध्ये खूपच वैविध्यही दाखवले आहे. हरतऱ्हेच्या भूमिका तिने आतापर्यंत साकारल्या आहेत. तिने आपल्या करिअरला अभिनयापुरतेच मर्यादित ठेवलेले नाही, तर निर्मितीच्या क्षेत्रातही तिने यशस्वी कामगिरी केली आहे. तिच्या या करिअर ग्राफची योग्य दखल घेऊन सिंगापूरच्या मादाम तुसां म्युझियममध्ये तिचा वॅक्‍स स्टॅच्यु उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या म्युझियममध्ये अनुष्काच्या आगोदर ओपेरा विन्फ्रे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रेसिंग कार ड्रायव्हर ल्युईस हॅमिल्टन यांचेही वॅक्‍स स्टॅच्यु उभारले गेले आहेत. यामध्ये जागा मिळवण्याचा मान अनुष्काला मिळणार आहे. तिचा पुतळा या म्युझियममध्ये असायला हवा, अशी मागणी युरोप आणि भारतातल्या तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती, असे या म्युझियमचे ऍलेक्‍स बोर्ड यांनी सांगितले. या तिच्या पुतळ्याचा ढाचाही तयार झाला आहे. फोनवर बोलत असलेल्या अनुष्काचा पुतळा उभा केला जाणार आहे. ही आयडिया एवढ्यासाठी की म्युझियम बघायला आलेले लोक जेंव्हा या पुतळ्यासमोर उभे राहून सेल्फी घेतील, तेंव्हा फोटो बघणाऱ्यांना हा भास होईल की अनुष्काने फोनवर बोलत असताना बोलणे थांबवून सेल्फीसाठी पोझ दिली आहे. शिवाय सेल्फी काढणाऱ्यांना अनुष्काच्या आवाजा शुभेच्छाही ऐकायला मिळतील. अशा प्रकारे बोलणाऱ्या व्यक्तीचा पुतळा या म्युझियममध्ये अन्यही काही व्यक्तींचे आहेत. मात्र एखाद्या भारतीय कलाकाराचा अशाप्रकारे बोलतानाचा पुतला पहिल्यांदाच असेल.

मादाम तुसां म्युझियम जगभरात अनेक ठिकाणी आहे. अनेक मान्यवरांचे स्टॅच्यु इथे आहेत. लंडनमधील म्युझियममध्ये नुकतेच करण जोहरचाही पुतळा उभा केला गेला आहे. याच म्युझियममध्ये अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्‍वर्या राय बच्चन, कतरिना कैफ आदींचे पुतळे आहेत. तर दिल्लीतल्या म्युझियममध्ये नरेंद्र मोदी, मधुबाला, कपिल देव, आशा भोसले, लेडी गागा आणि अँजोलिना जोलीचेही पुतळे आहेत. सध्या अनुष्का “झिरो’ आणि ‘सुई धागा- मेड इन इंडिया’ या सिनेमांच्या कामात व्यस्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)