सिंगापूरचे अभिनेते अलोयसिस पांग यांचे अपघाती निधन 

सिंगापूर – सिंगापूरचे प्रख्यात अभिनेते अलोयसिस पांग यांचे लष्करी प्रशिक्षण सरावादरम्यान तोफेच्या अपघातादरम्यान निधन झाले. न्यूझिलंडमधील वाइओरु लष्करी प्रशिक्षण केंद्रामध्ये ही दुर्घटना घडली. सिंगापूरमध्ये राष्ट्रीय सेवा अनिवार्य असल्याने पांग यांनीही या लष्करी सेवेमध्ये सहभाग घेतला होता. हॅमिल्टन येथील वैकातो हॉस्पिटलमध्ये पांग यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, असे संरक्षण मंत्रालयाने बुधवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

पांग केवळ 28 वर्षांचे होते. ही दुर्घटना घडली तेंव्हा पांग हे राखीव असतानाही सिंगापूरच्या लष्करी वाहनावर बसवण्यात आलेल्या स्वयंचलित हॉवित्झर तोफेच्या दुरुस्तीचे काम करत होते. त्यांच्या समवेत सैन्याचे दोन कर्मचारीही होते. मात्र दुर्दैवाने या तोफेच्या माऱ्यादरम्यान पांग यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना ताबडतोब वैकातो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या शस्त्रक्रियांसाठी सिंगापूरवरून विशेष तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र हे उपचार व्यर्थ गेले आणि पांग यांचा मृत्यू झाला. पांग यांनी 1999 पासूनच टिव्हीवरील मालिकांमधून भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यांना टिव्ही कलाकार म्हणून वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. देशातील सर्वात लोकप्रिय 10 कलाकारांमध्येही त्यांचा समावेश झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)