सिंगापुर मध्ये झाली ऐतिहासिक भेट

डोनाल्ड ट्रम्प यांची उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्याशी चर्चा


कोरियन द्विपकल्पात पुर्ण निशस्त्रीकरण करण्यास जोंग तयार


पण ट्रम्प म्हणाले तूर्तास त्यांच्यावरील निर्बंध कायम राहणार

सिंगापुर – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्यात आज येथे ऐतिहासिक भेट झाली. दोन्ही नेत्यांनी सौहार्दाच्या वातावरणात चर्चा केल्याने जागतिक शांततेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडले आहे. मध्यंतरी हे दोन्ही देश चांगलेच हमरीतुमरीवर आले होते त्यातून अणुयुद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला होता. हा धोका टाळण्यासाठी ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात चर्चा व्हावी असे प्रयत्न अनेक पातळ्यांवरून सुरू होते. अखेर ही चर्चा आज येथे चांगल्या वातावरणात पार पडल्याने जगातल्या अनेक देशांनी समाधान व्यक्त केले आहे.

या चर्चेनंतर दोन्ही देशांच्यावतीने एक संयुक्त निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले असून त्यात निशस्त्रीकरणाचे उद्दीष्ठ कसे साध्य करणार या विषयीचा काही तपशील देण्यात आला आहे. ही चर्चा समाधानकारक झाली अशी माहितीही या निवेदनात देण्यात आली आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की दोन्ही देशांनी इतिहासात एक नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरियन बेटांवर पुर्ण निशस्त्रीकरण करण्याची तयारी किम जोंग यांनी दर्शवली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की किम जोंग यांच्यासाठी ही भेट म्हणजे एक अपुर्व संधी होती. त्याचा त्यांनी चांगला उपयोग करून घेतला असून आपल्या देशातील क्षेपणास्त्र चाचणी प्रकल्प लवकरच बंद करून टाकण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर कोरियाने जगाच्या दबावाला न जुमानता अण्वस्त्रे तयार करण्याचे आणि त्याच्या चाचण्या घेण्याचे काम गेले अनेक वर्ष सुरू ठेवले होते. ते त्यांनी थांबवावे यासाठीच साऱ्या जगाचा अट्टहास होता. आजच्या चर्चेमुळे त्याला काही प्रमाणात यश आल्याचे मानले गेले आहे. आम्ही दोघांनी मानवी हक्कांविषयीही थोडक्‍यात यावेळी चर्चा केली असे ट्रम्प यांनी सांगितले. युद्धाचे वातावरण निवळावे अशी आमची इच्छा होती त्यादृष्टीने आमची चर्चा सकारात्मक झाली असे ते म्हणाले. अण्विक निशस्त्रीकरणानंतर कोरियाला संरक्षणाची पुर्ण हमी अमेरिकेने देऊ केली आहे. या चर्चेंनतर उत्तर कोरियामधील अण्वस्त्रे नष्ट करण्याचे काम वेगाने सुरू होईल अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली आहे. तथापी या चर्चेतून फक्त प्रतिकात्मक यश मिळाले असून ठोस असे काहींही साध्य झालेले नाही असे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

जग आता नवीन सुरूवात बघेल, अशी प्रतिक्रीया स्वता किम जोंग यांनी दिली आहे. त्यांनी या भेटीबद्दल म्हटले आहे की दोन देशांच्या नेत्यांमध्ये आज एैतिहासिक बैठक झाली त्यात मागचा सारा इतिहास विसरण्याचे ठरवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)