सिंगापुरातील 164 वर्ष जुन्या मंदिराचे जतन

सिंगापुर – सिंगापुरात 164 वर्ष जुने प्राचीन हिंदु मंदिर असून त्याचे जतन करण्यासाठी त्याच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 20 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. एक वर्षापासून हे काम केले जात असून त्यासाठी भारतातून 20 कारागीर येथे मागवण्यात आले आहेत. श्री श्रीनिवास पेरुमर मंदिर हे येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची प्राचीन बांधकाम व नक्षीकाम शैली कायम ठेऊन त्याचे नुतनीकरण केले जात असल्याने त्या कामाला वेळ लागत आहे पण हे काम वेळापत्रकानुसार सुरू असल्याची माहिती मंदिराच्या व्यवस्थान सूत्रांनी दिली. सिंगापुरातील ज्या भागाला मिनी भारत म्हणून ओळखले जाते त्या भागात हे मंदिर आहे.

एप्रिल महिन्यात हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानिमीत्त येथे मोठा उत्सवही आयोजित करण्यात आला आहे. भारतातून या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यासाठी 39 पुजाऱ्यांना आमंत्रित केले जाणार आहे. मंदिराचा हा धार्मिक विधी सुमारे पाच महिने चालणार आहे. सिंगापुर सरकारने या मंदिराला प्राचीन वास्तुचा दर्जा दिला असून तेथील सरकारच्या नियमानुसर दर बारा वर्षांनी मंदिराचे नुतनीकरण केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)