सिंगापुरातील हिंदु मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुर्ण

चाळीस हजार भाविकांसह पंतप्रधान ली यांची उद्‌घाटन सोहाळ्याला उपस्थिती
सिंगापुर – सिंगापुरातील 164 वर्ष जुन्या असलेल्या एका प्राचीन हिंदु मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या नवीन मंदिराचा लोकार्पण सोहोळा आज सिंगापुरचे पंतप्रधान ली हेसीन यांच्यासह 40 हजार भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निमीत्त मंदिराच्यावतीने महा सम्प्रोक्षणम सोहळा आयोजित करण्यात आला असून 45 दिवसांच्या सांस्कृतीक कार्यक्रमांचेही यात आयोजन करण्यात आले आहे. हे सिंगापुरातले सर्वात प्राचीन मंदिर समजले जाते.

सुमारे 34 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गेली दीड वर्ष हे काम सुरू होते. दर बारा वर्षानी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले जात आहे. सिंगापुरचे चार वरीष्ठ मंत्रीही या निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या विविध समारंभांना उपस्थित होते. सिंगापुरच्या बहुधर्मिय व बहुआयामी संस्कृतीचे हे मंदिर म्हणजे एक प्रतिक असल्याची प्रतिक्रीया या मंत्र्यांनी नोंदवली आहे. 1854 साली बांधण्यात आलेल्या या श्री श्रीनिवास पेरूमल मंदिराला राष्ट्रीय वारसा म्हणून सिंगापुर सरकारने स्थान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)