साहिल, आकाश, मुवाजम, ताहेरला सुवर्णपदक

पुणे: पुण्याच्या साहिल शेख, आकाश गोरखा, मुवाजम शेख, ताहेर इनामदार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्‍सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषिमंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सृजन करंडक 19 वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदकाची कमाई केली.

पारितोषिक वितरण सोहळ्यात स्पधेर्चे संयोजन समितीचे अध्यक्ष रोहित पवार, पुणे शहर बॉक्‍सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे, भारतीय बॉक्‍सर एल. देवेंद्रो, अभिनेते शिवराज वाळवेकर, राष्ट्रीय कॉंग्रेसचे शशिकांत तापकीर, गणेश नलावडे, मृणाली वाणी, भरत व्हावळ, मदन वाणी, गिरीश पवार, विजय यादव, सलमान शेख, राकेश कळसकर, अजित सिंग कोचर, राकेश तिवारी, वनराज आंदेकर, भोला सिंग अरोरा, सचिन पासलकर, पंडित कांबळे, शशिकला कुंभार, शिल्पा भोसले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील 49 किलो मुलांच्या गटातील अंतिम लढतीत पुणे शहरच्या साहिलने क्रीडापीठच्या शिवाजी गेदामवर 2-1 ने मात करून सुवर्णपदक पटकावले. यानंतर 56 किलो मुलांच्या गटाच्या अंतिम फेरीत पुणे शहरच्या आकाश गोरखाने मुंबई उपनगरच्या अब्दुल अन्सारीला 3-0 ने मात करून सुवर्ण यश मिळवले. यानंतर 60 किलो मुलांच्या अंतिम फेरीत पुणे शहरच्या मुवाजम शेखने जळगावच्या सागर आढळेवर 3-0ने मात करून विजेतेपद पटकावले. 64 किलो मुलांच्या अंतिम फेरीत पुणे शहरच्या ताहेर इनामदारने पुणे जिल्ह्याच्या केशव हंसला 3-0 ने नमविले आणि सुवर्णपदक पटकावले. तर, मुलांच्या गटात पुणे शहर संघाने 33 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)