साहित्य: हृदयंगम नात्याची कहाणी : अश्रूंची ही फुले

व्यंकटेश लिंबकर

पती-पत्नीमधील नाते किती उत्कट आणि हृदयस्पर्शी असू शकते, त्याचे अत्यंत भावरम्य चित्रण पहायचे असेल, तर ज्येष्ठ पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या विनिता देशमुख यांचे “अश्रूंची ही फुले’ हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे. पती विश्‍वास देशमुख यांच्या अत्यंत अनपेक्षित अशा निधनानंतर त्या घटनेचा व्यक्‍तिगत आयुष्यावर झालेला परिणाम, त्यानंतरचा अंतर्मनाचा प्रवास त्यांनी गद्य आणि पद्याच्या माध्यमातून अत्यंत समर्थपणे मांडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केवळ आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणे एवढाच मर्यादित हेतू या लेखनामागे नसून अशाच दु:खाने वेढलेल्या अवस्थेतील लोकांनाही त्यातील सल्ल्याचा उपयोग व्हावा अशीच लेखिकेची उदात्त भावना आहे.

म्हणूनच या वेगळ्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेतच लेखिका म्हणते की, “ज्यांना आपल्या आयुष्यात अतिशय जिवाभावाच्या व्यक्तीला गमवावे लागले आणि मुसळधार पावसात हमरस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या गाडीची दर्शनी काच धूसर झाल्याने काही क्षण पुढचे दिसेनासे व्हावे, तशा अवस्थेत आयुष्याची त्यानंतरची वाटचाल करणे भाग पडले, अशा प्रत्येक व्यक्तीस…’

अत्यंत प्रिय असलेल्या पतीच्या निधनानंतर एका झुंजार पत्रकाराचे एका कवयित्रीचा जन्म झाला आणि देशमुख यांनी तब्बल 33 कविता लिहिल्या. पती गमावल्याचे दु:ख आणि त्याच्या बरोबरच्या सहजीवनात सहभागी होता आले त्याचा आनंद अशा संमिश्र भावनेतून लिहिलेल्या या कविता म्हणजे एक हृदयस्थ संवेदनांना भावस्पर्शी आलेख आहे, हे नमूद करावेसे वाटते. प्रेम, ममत्त्व, आपुलकी, विनम्रता आणि कृतज्ञता या भावनांमधून आकाराला आलेलं हे पुस्तक म्हणजे ज्यांना आपल्या प्रियजनांच्या विरहाला सामोरं जावं लागलं, त्यांच्यासाठी दीपस्तभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारं आहे, हे नक्की. मूळ इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचा सार्थ आणि समर्पक अनुवाद अनिल टाकळकर यांनी केला आहे.

पुस्तक : अश्रूंची ही फुले
लेखिका : विनिता देशमुख
प्रकाशक : अमेय प्रकाशन
मूल्य : रु. 350/-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)