साहित्य विश्वात खळबळ ; श्रीपाद जोशींचा राजीनामा

मराठी साहित्य संमेलन वाद प्रकरण

यवतमाळ: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा आहे. त्यामुळे साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले होते. त्यामुळे साहित्य क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.  श्रीपाद जोशी यांनी आज महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर यांना ई-मेलने राजीनामा पाठवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज ठाकरेंकडून मिळाली राजीनाम्याची प्रेरणा

दरम्यान श्रीपाद जोशी म्हणाले, नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची प्रेरणा मला राज ठाकरे यांच्याकडून मिळाली. हा वाद मनसेच्या एका कार्यकर्त्याने संमेलन उधळण्याची धमकी दिल्याने सुरू झाला होता. त्या कार्यकर्त्याचे कृत्य आपल्या अंगावर घेऊन राज यांनी माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखविला. मी देखील तसेच केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)