साहित्य परिषदेच्या खजिनदारपदी पाटील

कराड – तांबवे ता. कराड येथील कृष्णत बुवा व बापूनाना महाराज आषाढी दिंडींचे प्रमुख विणेकरी सुरेश पाटील यांची वारकरी साहित्य परिषदेच्या कराड तालुका खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर महाराज दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बहिणाबाई महाराज गाथा पारायण सोहळा मंडळ व भाग्यलक्ष्मी गणेश मंडळ पाटील मळा, तांबवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारकरी मेळाव्यात सत्कार करण्यात आला. यावेळी पाटण तालुका अध्यक्ष आनंदराव देसाई, कराड तालुकाध्यक्ष अमोल महाराज धोंडेवाडीकर, जिल्हा सचिव दीपक महाराज रीसवडकर, खजिनदार हणमंत महाराज आबईचीवाडी, किशोर महाराज शेणोलीकर, बापूराव फडतरे, पी. एम. पवार, अनिल देसाई, शंकर देसाई, शंकर महिंदकर, अनिल शेणोलीकर, नारायण सुर्वे, संजय माने, सुरेश देसाई, अभिजीत देशमुख, शंकर रेवडे, संदीप बहुलेकर, आत्माराम वनवासमाचीकर, सचिन थोरात, आण्णासो देसाई, सतिश महाडिक, गणेश यादव, भगवान पाटील, दिगंबर साळुंखे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, सुरेश पाटील व श्रीमंत पाटील यांच्या परिश्रमातून कार्यक्रम संपन्न झाला. तांबवे गावातील युवक सौरभ ताटे व नवनिर्वाचित तालुका कार्यकारणी मंडळांचा सत्कार करण्यात आला. मधुकर महाराज म्हणाले, वारकरी सांप्रदयात येणाऱ्या प्रत्येक घटकाने सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले पाहिजे. वारकरी साहित्य परिषद सात कलमी कार्यक्रम राबवत सामाजिक कार्य करत राहिल. संताचा विचार लोकांच्यापर्यत पोहचविण्यासाठी वारकरी सांप्रदाय महत्वाचा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)